Posts

Showing posts from 2017

' 'र' फार युक्त शब्द वाचन'

वर्ग दुसरी च्या मुलांना 'र'फार युक्त शब्द वाचताना अडथळे निर्माण होउ नयेत ,मुले मध्येच न थांबता अस्खलित वाचन करावेत,असे विचार मनात नेहमी येत असतात. वाचतांना मुलांना आनंद निर्माण झाला पाहिजे. त्या करिता अस्खलित वाचणासाठी व शब्दांच्या द्रुढिकरणासाठी मी  राबवित असलेला उपक्रम ' 'र'फार युक्त शब्द वाचन'. काही शब्द----       अर्क,आर्य,अर्थ,अर्श,उर्वशी,उर्दू,कार्य,कार्बन, अर्बन,खूर्दा,खर्व, गर्व, गर्दी, चूर्ण, जीर्ण, तर्क, दुर्मिळ, दूर्गा,दुर्लक्ष,दुर्बळ,धूर्त, नर्क, नार्थ, पर्वत, पार्थ, पूर्व, पार्थिव,फर्स्ट,फर्क,बर्फ, भार्या,मर्म, मार्ग, वर्क, वर्ग, वर्ज, वर्ष, शौर्य,सर्जन,सर्वदा,सूर्य,स्वर्ग, हर्ष, इत्यादी.                  या शब्दवाचनाच्या नियमित सरावाने मुले अस्खलित वाचन करतात. असे दिसून येते.हा उपक्रम वर्ग १ते४ च्याअप्रगत मुलासाठीही घेता येईल.       

CONVERSATION. (Class 1 to 4)

मित्रांनो मराठी शाळेतील वर्ग 1ते4च्या विद्यार्थ्यांना ईग्रजीत बोलता येत नाही .मुले ईंग्रजी विषयाला घाबरतात .मुलांना ईंग्रजी विषयाची गोडी लागावी  त्या करिता मी Conversation हा उपक्रम निवडला.मुले आवडीने या उपक्रमात सहभागी होतात .काही उदाहरणे:- Rama:- what is your name? Sudha:- My name is Sudha.                and what is your name? Rama:-  My name is Rama.              How old are you? Sudha:- I am 8 years​ old.                Where do you live? Rama:-. I live at Bondgaon/Devi.                Which class do you learn? Sudha:-  I learn in 3rd standard.                 and you? Rama:-. I am learning in second .                Who is your class teacher? Sudha:-. My class teacher is              ...

दोन अंकी संख्याचे उलट वाचन

                                              दुसरीच्या बर्याच विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्या सलग वाचता येतात.पण मधली संख्या सांगत नाही.त्या मुलांसाठी मी छोटासा उपक्रम घेण्याचे ठरवले.                       सर्वप्रथम न वाचता येणार्या संख्या शोधून काढल्या. त्यांचे कार्ड तयार केले. जसे-- १९,२९,३९ ,४९,५९,६९,७९,८९,९९.या संख्यांचा सराव करून घेतला.नंतर ९९ पासून ते१९ पर्यंत  संख्या उलट क्रमाणे वाचन सराव घेतला.कार्ड दाखवून संख्या विचारल्या तर मुलांनी अचूक वाचन केले.                                                                               ही  सोपी व साधी पद्धत अनेक गुरूजनांना माहित आहे.शहरी व ग्रामीण दोन्ही...

My Life Journey(एक उपक्रम)

अलीकडे  जिवनात बोलतांना इंग्रजीला फारच महत्व आहे.त्यामुळे मी तीन वर्षांपासून Life Journey जीवनवृतांत हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहे .माझी शाळा ही एक आदिवासी गावात असून एक ते चार वर्ग आहेत आणि  तिथे सर्व आदिवासी पालकांचे मुले शिकायला येतात. इंग्रजीचे आधी पासून कसलेच वातावरण नसताना सुद्धा पहिली दुसरीतील  मुले स्वतः आपले जीवन वृत्तांत इंग्रजीत सांगतात . जसे उदा. My name is Rohan. My father name is Rama. My sirname is Gomase. I live at Bondgaon Devi. My school name is Z. P. Primary School Bondgaon Devi. I learn at 2nd Standard. I woke up at 6 'o' clock. My favourite game is Cricket. I like milk. My favourite subject is English. I love my school. This is my life journey. जीवन वृतांत खुप मोठा असतो परन्तु वर्ग दुसरीच्या मुलांकरिता हां एवढाच कमीत  कमी सराव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  त्यामुळे वाचकांनी गैरसमज करून घेऊ  नये. मुलांच्या बुद्धयान्काचा विचार करावा .                ...

दोन अक्षरी अनुस्वार युक्त शब्दवाचन

मित्रांनो वर्ग 2रीची अनेक मुले सलग वाचतात.पण काही अनुस्वारयुक्त शब्दांमुळे थांबतात.पुढे वाचत नाही तो शब्द सांगीतले की पुन्हा वाचतात. त्या मुळे मी अस्खलीत वाचनाकरीता अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा उपक्रम निवडला.दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचता आले की तीन अक्षरी,चार अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द आपोआप वाचन करतात.म्हणून दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा ऊपक्रम प्रथम घेतला. काही शब्द-- अंध,अंक,अंत,आंबा,अंडा,कंधा,कोंब,खांब,खांदा,गंध,चंदू,चिंकू,जांब,कांदा, डंका,ठंडा,ढोंग,तंबू,थुंकी,धंदा,नंदू,पंच ,फांदी,बांबू,रंग,लौंग,शंका,सांधा इत्यादी. वरील शब्दांचे कार्ड तयार करुन मुलांना वाचायला द्यावित.पुढेदोन अक्षरी,तिन अक्षरी ,चार अक्षरी व पुढे जास्त अक्षरी अनुस्वारयुक्त शब्दांचे कार्ड तयार करून वाचन सराव घ्यावा. या सरावाने मुले न अडखळता वाचन करतात.आपणही हा उपक्रम करु शकता.

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

बर्याचदा असा अनुभव आला आहे की वर्ग दुसरी च्या काही मलांना जोडाक्षर युक्त शब्द वाचता येत नाही.त्याकरिता दोन अक्षरी,तिन अक्षरी,चार अक्षरी जोडाक्षर युक्त शब्दांचे वाचन घेण्यात यावे.त्याकरीता मी 'दोन अक्षरी जोडाक्षर 'युक्त शब्दांचे वाचन हा ऊपक्रम निवडला .ऊत्तम प्रतिसाद मिळाला.मुले भरभर वाचू लागली.दोन अक्षरी जोडाक्षर युक्त शब्द वाचनानंतर तिन अक्षरी व चार अक्षरी जोडाक्षर युक्त शब्दांचे वाचन करतांना मुलांना अडचन निर्माण  झाली नाही.यामुळे मी 'दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन' या ऊपक्रमालाच प्रथम प्राधान्य दिले.           यातील काही शब्द। *आम्ही, तुम्ही, अर्थ, अर्ज, काव्य, दिव्य, द्रव्य,गर्दी, सर्व, प्रश्न, न्याय, छत्री,तिच्या, आत्या,व्याज, फ्राक,व्यास,ध्यास,तर्क,नाम्या,वाक्य,रम्य,कोल्हा,सैन्य,तान्हा.ईत्यादी        कार्ड तयार करुन वाचन सराव घेण्यात यावा.नक्कीच हा उपक्रम प्रगतशिल मुलासाठी ऊत्तम व सोपा उपक्रम सिद्ध होईल.

Picture reading. (Animal card)

मुलांना प्राण्यांची अचूक माहिती प्राप्त व्हावी व त्यांच्या संकल्पना द्रूढ व्हाव्यात,चांगले वाचता यावे या करिता मी  वर्ग दुसरी करीता 'animal picture reading' हा उपक्रम घ्यायचे ठरवले.        त्यांच्या परीचयाचे चित्र कार्ड तयार करून एका बाजुला प्राण्यांचे ईंग्रजी नावे लिहायचे व वाचायला द्यायचे. काही दिवसानंतर मुले चित्र न पाहता शब्दांचे अचूक वाचन करू लागले.हा ऊपक्रम मला फार आवडला .आपणही विद्यार्थ्यांना हा ऊपक्रम राबवू शकता.व वर्ग दुसरीच्या मुलाना वाचनाची गोडी लावू शकता.         काही शब्द   Cat,dog,ox,cow,goat,horse,buffalo,tortoise,hare,mouse,lion,tiger,zebra,squirrel,fish, elephant,fox,man,deer,woman.    

ईंग्रजी दोन अक्षरी शब्दांचे वाचन

Image
ज्या वर्ग दुसरीच्या मुलांना ईंग्रजीचेदोन अक्षरी शब्द वाचता येत नाही त्यांच्या करीता हा उपक्रम मी घेत आहे बर्यापैकी मुले वाचायला शिकली    काही शब्द---       to,go,do,me,my,by,on,no,up,at,of,ox,or,am

Majhi Shala Majhe Upkram: शिक्षा यह एक जिवण प्रणाली है। यह वाघीन का दुध है ज...

Majhi Shala Majhe Upkram: शिक्षा यह एक जिवण प्रणाली है। यह वाघीन का दुध है ज... : शिक्षा यह एक जिवण प्रणाली है। यह वाघीन का दुध है जो इसे प्राशन करेगा वह बाघ जैसाही गुरगुरणे लगेगा।
Image
शिक्षा यह एक जिवण प्रणाली है।  यह वाघीन का दुध है जो इसे प्राशन करेगा वह बाघ जैसाही गुरगुरणे लगेगा।

सर्वांचे स्वागत

माझ्या ब्लोगवर सर्वांचे स्वागत आहे.