Posts

Showing posts from November, 2017

दोन अंकी संख्याचे उलट वाचन

                                              दुसरीच्या बर्याच विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्या सलग वाचता येतात.पण मधली संख्या सांगत नाही.त्या मुलांसाठी मी छोटासा उपक्रम घेण्याचे ठरवले.                       सर्वप्रथम न वाचता येणार्या संख्या शोधून काढल्या. त्यांचे कार्ड तयार केले. जसे-- १९,२९,३९ ,४९,५९,६९,७९,८९,९९.या संख्यांचा सराव करून घेतला.नंतर ९९ पासून ते१९ पर्यंत  संख्या उलट क्रमाणे वाचन सराव घेतला.कार्ड दाखवून संख्या विचारल्या तर मुलांनी अचूक वाचन केले.                                                                               ही  सोपी व साधी पद्धत अनेक गुरूजनांना माहित आहे.शहरी व ग्रामीण दोन्ही...

My Life Journey(एक उपक्रम)

अलीकडे  जिवनात बोलतांना इंग्रजीला फारच महत्व आहे.त्यामुळे मी तीन वर्षांपासून Life Journey जीवनवृतांत हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहे .माझी शाळा ही एक आदिवासी गावात असून एक ते चार वर्ग आहेत आणि  तिथे सर्व आदिवासी पालकांचे मुले शिकायला येतात. इंग्रजीचे आधी पासून कसलेच वातावरण नसताना सुद्धा पहिली दुसरीतील  मुले स्वतः आपले जीवन वृत्तांत इंग्रजीत सांगतात . जसे उदा. My name is Rohan. My father name is Rama. My sirname is Gomase. I live at Bondgaon Devi. My school name is Z. P. Primary School Bondgaon Devi. I learn at 2nd Standard. I woke up at 6 'o' clock. My favourite game is Cricket. I like milk. My favourite subject is English. I love my school. This is my life journey. जीवन वृतांत खुप मोठा असतो परन्तु वर्ग दुसरीच्या मुलांकरिता हां एवढाच कमीत  कमी सराव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  त्यामुळे वाचकांनी गैरसमज करून घेऊ  नये. मुलांच्या बुद्धयान्काचा विचार करावा .                ...

दोन अक्षरी अनुस्वार युक्त शब्दवाचन

मित्रांनो वर्ग 2रीची अनेक मुले सलग वाचतात.पण काही अनुस्वारयुक्त शब्दांमुळे थांबतात.पुढे वाचत नाही तो शब्द सांगीतले की पुन्हा वाचतात. त्या मुळे मी अस्खलीत वाचनाकरीता अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा उपक्रम निवडला.दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचता आले की तीन अक्षरी,चार अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द आपोआप वाचन करतात.म्हणून दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा ऊपक्रम प्रथम घेतला. काही शब्द-- अंध,अंक,अंत,आंबा,अंडा,कंधा,कोंब,खांब,खांदा,गंध,चंदू,चिंकू,जांब,कांदा, डंका,ठंडा,ढोंग,तंबू,थुंकी,धंदा,नंदू,पंच ,फांदी,बांबू,रंग,लौंग,शंका,सांधा इत्यादी. वरील शब्दांचे कार्ड तयार करुन मुलांना वाचायला द्यावित.पुढेदोन अक्षरी,तिन अक्षरी ,चार अक्षरी व पुढे जास्त अक्षरी अनुस्वारयुक्त शब्दांचे कार्ड तयार करून वाचन सराव घ्यावा. या सरावाने मुले न अडखळता वाचन करतात.आपणही हा उपक्रम करु शकता.