जोहार मायबाप जोहार महारांचा जोहार
जोहार मायबाप जोहार! महाराचा जोहार! _________________________ नरेश एम गोंडाणे अर्जुनी/ मोर गोंदिया M.N.- 9421882033 ______________________ नागवंशीयांचा इतिहास हा भारतातील महान शूरवीरांचा शौर्याचा इतिहास आहे .आदिशक्तीचा शेवटचा मुलगा शेष याला जी संतान झाली, तोच शेषवंश अर्थात नागवंश होय. हाच नागवंश सर्व पृथ्वी व्यापून बसला होता. त्याला वेगवेगळ्या विभागात ,वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नावे आहेत. यातीलच "महार " हे एक नाव होय. पूर्वी "जोहार " हा शब्द प्रयोग प्रथम नागवंशी लोकांनी केला. महाभारतात मगधचा राजा जरासंधासमोर कृष्णाला 18 वेळा पराभव पत्करावा लागला .पुढे भिमाच्याकडून कृष्णाने जरासंधास ठार केले. पांडवानंतर हस्तिनापुरात परीक्षित राजा झाला. याला नंदीवर्धन नावाच्या नागराजाने ठार केले. व हस्तीनापुरात नागराजे राज्य करू लागले .काही दिवसानंतर परीक्षिताचा मुलगा जनमजय याने बापाचा सूड घेण्यासाठी जोरदार मोहीम उघडली .व नागलोकाविरुद...