दोन अक्षरी अनुस्वार युक्त शब्दवाचन

मित्रांनो वर्ग 2रीची अनेक मुले सलग वाचतात.पण काही अनुस्वारयुक्त शब्दांमुळे थांबतात.पुढे वाचत नाही तो शब्द सांगीतले की पुन्हा वाचतात.
त्या मुळे मी अस्खलीत वाचनाकरीता अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा उपक्रम निवडला.दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचता आले की तीन अक्षरी,चार अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द आपोआप वाचन करतात.म्हणून दोन अक्षरी अनुस्वारयुक्त शब्द वाचन हा ऊपक्रम प्रथम घेतला.
काही शब्द--
अंध,अंक,अंत,आंबा,अंडा,कंधा,कोंब,खांब,खांदा,गंध,चंदू,चिंकू,जांब,कांदा, डंका,ठंडा,ढोंग,तंबू,थुंकी,धंदा,नंदू,पंच ,फांदी,बांबू,रंग,लौंग,शंका,सांधा इत्यादी.
वरील शब्दांचे कार्ड तयार करुन मुलांना वाचायला द्यावित.पुढेदोन अक्षरी,तिन अक्षरी ,चार अक्षरी व पुढे जास्त अक्षरी अनुस्वारयुक्त शब्दांचे कार्ड तयार करून वाचन सराव घ्यावा.
या सरावाने मुले न अडखळता वाचन करतात.आपणही हा उपक्रम करु शकता.

Comments