वर्ग दुसरी च्या मुलांना 'र'फार युक्त शब्द वाचताना अडथळे निर्माण होउ नयेत ,मुले मध्येच न थांबता अस्खलित वाचन करावेत,असे विचार मनात नेहमी येत असतात. वाचतांना मुलांना आनंद निर्माण झाला पाहिजे. त्या करिता अस्खलित वाचणासाठी व शब्दांच्या द्रुढिकरणासाठी मी राबवित असलेला उपक्रम ' 'र'फार युक्त शब्द वाचन'. काही शब्द---- अर्क,आर्य,अर्थ,अर्श,उर्वशी,उर्दू,कार्य,कार्बन, अर्बन,खूर्दा,खर्व, गर्व, गर्दी, चूर्ण, जीर्ण, तर्क, दुर्मिळ, दूर्गा,दुर्लक्ष,दुर्बळ,धूर्त, नर्क, नार्थ, पर्वत, पार्थ, पूर्व, पार्थिव,फर्स्ट,फर्क,बर्फ, भार्या,मर्म, मार्ग, वर्क, वर्ग, वर्ज, वर्ष, शौर्य,सर्जन,सर्वदा,सूर्य,स्वर्ग, हर्ष, इत्यादी. या शब्दवाचनाच्या नियमित सरावाने मुले अस्खलित वाचन करतात. असे दिसून येते.हा उपक्रम वर्ग १ते४ च्याअप्रगत मुलासाठीही घेता येईल.
Comments
Post a Comment