अनेक दिवसांपासून जि प व प्रा शाळा अरततोंडी दा या ठिकाणी मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात येतात. परंतू ईंग्रजी मध्ये कसे बोलावे व कसे साजरे करावे हे मुलांना जमत नाही. त्या करीता मी सोप्या पध्दतीचा वापर करुन मुलांचे वाढदिवस कसे साजरे करायचे याची पुरेशी तयारी करवून घेतली. यानंतर आता अनेक विद्यार्थी ईंग्रजी मध्येबोलून वाढदिवस साजरा करतात .
यामुळे विद्यार्थी आनंदी होऊन या उपक्रमात सहभागी होतात .या मुळे मुलांमधिल ईंग्रजी विषयाची भिती दूर होण्यास मदत होते .सर्व मुलांना या उपक्रमात भाग घेता येते. पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आपणही आपल्या शाळेत अशाप्रकारचे मुलांचे "वाढदिवस अभिनंदन "साजरे करू शकता.
Comments
Post a Comment