जोहार मायबाप जोहार महारांचा जोहार
जोहार मायबाप जोहार! महाराचा जोहार!
_________________________
नरेश एम गोंडाणे
अर्जुनी/ मोर गोंदिया
M.N.- 9421882033
______________________
नागवंशीयांचा इतिहास हा भारतातील महान शूरवीरांचा शौर्याचा इतिहास आहे .आदिशक्तीचा शेवटचा मुलगा शेष याला जी संतान झाली, तोच शेषवंश अर्थात नागवंश होय. हाच नागवंश सर्व पृथ्वी व्यापून बसला होता. त्याला वेगवेगळ्या विभागात ,वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नावे आहेत. यातीलच "महार " हे एक नाव होय.
पूर्वी "जोहार " हा शब्द प्रयोग प्रथम नागवंशी लोकांनी केला. महाभारतात मगधचा राजा जरासंधासमोर कृष्णाला 18 वेळा पराभव पत्करावा लागला .पुढे भिमाच्याकडून कृष्णाने
जरासंधास ठार केले.
पांडवानंतर हस्तिनापुरात परीक्षित राजा झाला. याला
नंदीवर्धन नावाच्या नागराजाने ठार केले. व हस्तीनापुरात नागराजे राज्य करू लागले .काही दिवसानंतर परीक्षिताचा मुलगा जनमजय याने बापाचा सूड घेण्यासाठी जोरदार मोहीम उघडली .व नागलोकाविरुद्ध युद्ध जाहीर केले. यालाच सर्पयज्ञ म्हणतात.
दोन्ही सैन्याची गाठ सातपुड्याच्या पायथ्याशी नागपुराजवळ पडली .या युद्धात जनमजय याचे विरुद्ध नंदीवर्धन ( तक्षक )यांची जोरदार लढाई सुरू झाली. या युद्धात
नंदीवर्धन (तक्षक) व ईतर मारले गेले .तसेच या युद्धात अनेक महावीर मारल्या गेले.
या युद्धात जे जे महावीर मारल्या गेले, त्यांच्या स्त्रिया बायका, अग्नीत जाळून घेत असत .यालाच महाराचा "जोहार " म्हणतात. या युद्धातील संहार पाहून सातपुडा पर्वतावर असलेला तपस्वी महामुनी आस्तिक ,नागभूमी येथील युद्ध भूमीवर येऊन जनमजय व नागलोक यांच्यात समेट घडवून आणला .व हे महाभयंकर युद्ध थांबले. हे युद्ध महाभारतासारखे झाले .असे गुरु गोपाळ चक्रनारायण आपल्या महार मराठा या पुस्तकांमध्ये म्हणतात.(पान न 32)
या युद्धाच्या समेटापासूनच महारांना 52 प्रकारचे अधिकार मिळाले .त्यामध्ये एक अधिकार होता जनावरांचे मांस खाणे. पूर्वी द्रविडवासी हा कंदमुळे, फळे, धान्य ,जनावरांचे मांस खात असे. ज्या 52 प्रकारच्या अधिकारासाठी जे लोक लढले श्रम घेतले त्याच लोकांना बावणे ,बावनेर असे नाव पडले .या जातीचे लोक किंवा आडनावे महार आणि मराठ्यांच्या कुळात पाहायला मिळतात.
या युद्धाच्या वेळी जे नागा महावीर मारल्या गेले. हरले त्यांच्या पत्नीने जोहार करून स्वतः जाळून घेतले . त्यांचे मूलबाळ उघडे पडले. व ते भीक मागू लागले .त्यांना कोणी आईवडिलांचे नाव विचारले ,तर ते जोहार मायबाप जोहार ! महारांचा जोहार हेच उत्तर देत असत. याचा सरळ अर्थ हा आहे की जोहारात म्हणजे युद्धात आमचे मायबाप मारल्या गेले. पुढे यांचे रूप शूद्र किंवा अतिसुद्र निर्माण झाले असावे .पण हे शूद्र नसून एकेकाळच्या महावीरांची संतान आहे हे सिद्ध होते .
पूर्वी महार ही एक जात नसून बहुजन समाज होता .व महार हे शूरवीराचे प्रतीक होते. याबरोबरच पूर्वी महाराप्रमाणेच आदिवासींचा जोहार, राजपुतांचा जोहार, मराठ्यांचा पण जोहार सुरू होता. तसेच संतांचा पण जोहार होता. अनेक जातींचे जोहार सुरू होते . हे सर्व पूर्वी नाग लोक म्हणून प्रसिद्ध होते. हे सर्व पूर्वी एकाच वंशापासून निर्माण झालेले असावेत .यांचे गोत्र एकच असावेत . परंतु काही दुष्ट लोकांनी इतिहासाला एवढा विद्रूप करून ठेवला, की आपले पूर्वज कोण हे सांगता येत नाही .त्याला आता खूप मेहनत घ्यावी लागेल .या नाग लोकात sc ,st ,obc व इथे बाहेरून येऊन स्थायी झालेले काही ब्राह्मण, पुढे यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी सुद्धा स्वतःला नागवंशीय संबोधले होते. त्याबरोबरच क्षत्रिय ,इतर वर्ग सुद्धा सात मध्ये होता .परंतु बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर महारांचा जोहार हा शब्द नष्ट झाला व तिथे दुसरा शब्द नमस्कार, जय भीम किंवा इतर उपयोगात आला.
अनेक तत्वज्ञानी व्यक्ती जोहार या शब्दाच्या उत्पत्ती विषयी स्पष्टपणे सांगताना दिसत नाही . अनेक लेखकांच्या मते
याबाबतीत एक वाक्यता दिसत नाही .अजून काही खूप संशोधन करणे आवश्यक आहे .काही जमातीमध्ये प्रकृतीच्या कल्याणासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे" जोहार" असे म्हणतात.
हे जरी खरे असले तरी महार या जातीमध्ये अनेक जाती समाविष्ट होत्या हे विधानही सत्य इतिहास कथन करते .अनेक पुराव्यावरून महारांची आडनावे आजही ईतर जातीमध्ये पहायला मिळतात. याचे मुख्य कारण यांचे वंशज पूर्वी एक असावे हेच सिद्ध होते .नागवंशी व महार हे दोन्ही शब्द द्रविडीयन आहेत. म्हणून पूर्वी बहुजन समाज एक होता . त्यांना नागवंशीय या संबोधनाने ओळखले जात होते . त्यातीलच "शूरवीर "ही महार जात होय .यावरून जोहार मायबाप जोहार ! महारांचा जोहार ! हे त्याकाळी वापरलेले विशेषण योग्य व अचूक वाटते .
आजही अनेक ठिकाणी जोहार या शब्दाचा वापर केला जातो. फार पुरातत काळापासून ते आजपर्यंत या शब्दाचा वापर इतिहासात पाहायला मिळते . त्याचे वापरकरते वेगवेगळे जरी असले, तरी पण ते एक असावेत. हा त्या शब्दाचा दृष्टिकोन सूचित करतो. व सिद्ध करतो.
Comments
Post a Comment